IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (Border gavaskar Trophy)  पराभव केला आहे. पॅट कमिन्सच्या (pat cummins) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन्ही सामन्यात मानहाणीकारक पराभव स्विकारावा लागला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने (Australian ex cricketer Michael Clarke) आपल्याच संघावर जोरदार टीका केली आहे. अनेक चुकांमुळे भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने अशी खराब कामगिरी केल्याचे क्लार्कने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टवर क्लार्कने आपलं मत मांडले आहे. तसेच 9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामना न खेळणे ही मोठी चूक होती, असे क्लार्कला वाटते. त्याऐवजी पॅट कमिन्सने नागपुरातील मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी बेंगळुरूजवळ एक संक्षिप्त शिबिर घेऊन आणि घरच्या मैदानावर भारतीय परिस्थितीप्रमाणे परिस्थिती तयार करून सराव केला होता. दोन आठवड्यांनंतर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव स्विकाराला लागला आहे आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली आहे.


फिरकीला अनुकूल परिस्थितीत फलंदाजी कशी करायची हे ऑस्ट्रेलियाने भारताकडून शिकायला हवे होते, असेही मायकल क्लार्कने म्हटले आहे. "आमचा संघ भारताची फलंदाजी पाहत नसल्याचे यातून दिसते. या लोकांना परिस्थिती चांगली माहित आहे आणि त्यानुसार ते खेळतात. ते इतके चांगले असताना आपण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न का करावा? आम्ही 200 धावा केल्या असत्या तर सामना जिंकू शकलो असतो. आमची धावसंख्या एका विकेटसाठी 60 धावा होती. ऑस्ट्रेलियाने 52 धावा जोडून त्यांचे शेवटचे 9 विकेट गमावले. भारताला 115 धावांचे लक्ष्य मिळाले होते ते त्यांनी 4 गडी गमावून पूर्ण केले," असं मायकल क्लार्क म्हणाला.