कोलकाता : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी बंदूक हातात घेतल्याचं पहायला मिळालं.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी वन-डे मॅच गुरुवारी कोलकाता येथे होणार आहे. या मॅचसाठी टीम इंडिया मैदानात उतरणार होती मात्र, पावसाने अडथळा निर्माण केला. त्यामुळे टीम इंडियाला मैदानात प्रॅक्टिस करता आली नाही. 


प्रॅक्टीसमध्ये पावसाचा अडथळा आल्याने महेंद्र सिंग धोनी याने कोलकाता पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर धोनीने चक्क बंदूक हातात घेत नेमबाजी केली.


कोलकाता पोलिसांनी आपल्या फेसबूक पेजवर म्हटलं आहे की, "महान महेंद्र सिंग धोनीने वेळ काढत बुधवारी पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रवेश केला आणि नेमबाजीची प्रॅक्टीस केली. त्यांचा नेम खूपच चांगला आहे."



दरम्यान, पाच मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी मॅच रंगणार आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवत सीरिजमध्ये १-०ने आघाडी मिळवली आहे.