Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संधी दिली अन् अय्यरने संधीचं सोनं केलं. श्रेयस सोबतच शुभमन गिलने (Shubman Gill) देखील आज मैदान मारल्याचं दिसून आलंय. मात्र, या सामन्यातील एक क्षण सध्या चर्चेचा विषय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) लवकर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात मिळाली. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने धावांची फडशा पाडला. दोघांनी दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू केलं अन् कांगारूंच्या बत्त्या गुल केल्या. या सामन्यात शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पाची धुलाई केली. सामन्यात त्याने झॅम्पला मिडविकेटच्या दिशेने एक खणखणीत सिक्स मारला. त्यानंतर श्रेयस अय्यरची रिअॅक्शन पाहण्याजोगी होती.


पाहा Video




दरम्यान, टीम इंडियाने पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर आता 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. 


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (C), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (C), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.