मोहाली : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs Aus T20 Series 2022) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला आजपासून (20 सप्टेंबर) सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीने (Virat Kohli) नेट्समध्ये जोरदार सराव केला. विराटने या दरम्यान विशेष म्हणजे बॉलिंगचा सराव केला. (ind vs aus t20 series 2022 team india virat kohli bowling practise in nets before 1st match against australia at punjab cricket association is bindra stadium mohali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्स प्रॅक्टीस केली. या दरम्यान अनेक गोलंदाजांनी बॉलिंगचा सराव केला. यामध्ये विराटनेही बॉलिंग टाकली. बीसीसीआयने (Bcci) बॉलिंग प्रॅक्टीसचा व्हीडिओ शेअर केला आहे. तसेच पंजाब क्रिकेट असोसिएशननेही विराटचे फोटो ट्विट केलेत.



विराटने नुकत्याच झालेल्या आशिय कपमध्येही (Asia Cup 2022) बॉलिंग केली होती.  विराटने हॉंगकाँग विरुद्ध 1 ओव्हर टाकली होती. यामध्ये त्याने 6 रन्स दिल्या होत्या. याआधी विराटने 31 मार्च 2016 मध्ये विंडिज विरुद्ध टी 20 सामन्यात बॉलिंग केलेली. विराटने तेव्हा 1.4 ओव्हरमध्ये 15 रन्स देत 1 विकेट घेतली होती.


विराटचं जोरदार कमबॅक


विराटला जवळपास 3 वर्षांपासून आपल्या लौकीकाला साजेशी कामिगरी करता आली नव्हती. मात्र विराटने आशिया कपमध्ये जोरदार मुसंडी मारत कमबॅक केलं. विराटने शतक ठोकलं. त्यानंतर आता विराट बॉलिंगच्या प्रॅक्टीसला लागलाय. त्यामुळे विराटची पुढची योजना काय, अशी चर्चा क्रिकेटविश्वात रंगू लागली आहे.