पर्थ : टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलियात (Australia) टी20 वर्ल्ड कप (T20 world Cup)  सामना खेळतेय. या वर्ल्ड कप सामन्यापुर्वी टीम इंडिया काही वॉर्मअप सामने देखील खेळली. आज रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया प्रतिस्पर्धी संघाना काँटे की टक्कर देताना दिसणार आहे. या सामन्याची चर्चा सुरु असताना विराटचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लची आता चर्चा सुरु झाली आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. हे चाहते नेहमी त्याला भेटण्यासाठी आतूर असतात. हे चाहते त्याला भेटण्यासाठी कधी स्टेडीअमची सुरक्षा भेदून आत जातात. तर कधी सामन्यानंतर भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. ज्यानंतर त्याची भेट होत असते. प्रत्येक देशाच्या दौऱ्यावर या गोष्टी होत असतात. 


दरम्यान आता विराटचा (Virat Kohli) एका तरूणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही विराटची फॅन असल्याची माहिती आहे. त्याची ही फॅन दिसायला खुपच सुंदर असल्याने तीची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ही तरूणी कोण आहे? असा प्रश्न आता फॅन्सला पडलाय. 



कोण आहे 'ती' मिस्ट्री गर्ल? 


विराट कोहली (Virat Kohli) सोबत फोटोत दिसलेल्या 'त्या' फिमेल फॅनच नाव अमिषा बसेरा (ameesha basera) आहे. अमिषा ही ब्रिस्बेनमध्ये विराटला भेटली होती. यावेळी तिने विराटसोबत फोटो क्लिक केला होता. यानंतर अमिषा बसेरा आणि विराटचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 



अमिषा (ameesha basera) क्वीन्सलँड विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. जेव्हा अमीषा बसेराने विराट कोहलीसोबतचा  (Virat Kohli) तिचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला तेव्हा तिचे जवळपास 1000 फॉलोअर्स होते. पण हा फोटो व्हायरल होताच आता त्याच्या फॉलोअर्सची संख्या 3 पट वाढली आहे.



दरम्यान टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्धचा व़ॉर्मअप सामना 6 धावांनी जिंकला. आता दुसरा सराव सामना बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.