IND vs AUS Warm UP Match : T20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडिया ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अन ऑफिशिअ सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आपल्या सर्वोत्तम संघासह सराव सामन्यात उतरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) आजचा सामना खेळत नाहीत. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला होता. मात्र या सामन्यात टीम इंडिया संघाची सर्वात मोठी ताकद समजणार खेळाडू आज पिछाडीवर पडला आहे. हा खेळाडू गेल्या काही काळापासून सतत फ्लॉप ठरत आहे.


सराव सामन्यात हा खेळाडू पिछाडीवर


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुलने टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. केएल राहुलची तडाखेबंद फलंदाजी केली. पण या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. रोहित शर्माचा खराब फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आणि त्याने 14 चेंडूत 15 धावा केल्यावरच त्याची विकेट गेली आहे. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.


वाचा : Cricket इतिहासातील असे 3 विचित्र योगायोग ज्यांच्यावर विश्वास बसणे अशक्य  


टीम इंडियाचं टेन्शन वाढलं


सराव सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहुलने सर्वाधिक 57 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 50 धावा केल्या. विराट कोहलीनेही चांगली सुरुवात केली पण तो 19 धावा करून बाद झाला आणि दिनेश कार्तिकने 20 धावांची खेळी खेळली.


T20 विश्वचषक 2022 मधील यादी


भारत विरुद्ध पाकिस्तान पहिला सामना 23 ऑक्टोबर (IND vs PAK )
भारत विरुद्ध अ गट उपविजेता दुसरा सामना 27 ऑक्टोबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना 30 ऑक्टोबर (India vs South Africa)
भारत विरुद्ध बांगलादेश चौथा सामना 2 नोव्हेंबर (India vs Bangladesh)
भारत विरुद्ध ब गट विजेता पाचवा सामना 6 नोव्हेंबर 


भारताची प्लेइंग इलेव्हन ( India's playing XI) - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुनवेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग ( Rohit (C), Rahul, Virat, Surya, Hardik, Karthik (WK), Axar, Ashwin, Harshal, Bhuvi and Arshdeep.)