Ind vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर
आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे
Ind vs Aus Semifinal Women T20 World Cup: आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा एक नाही तर 2 मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सेमीफायनलच्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. याशिवाय टीम इंडियाची वेगवान गोलंदाज देखील खेळणार नसल्याची माहिती आहे.
Harmanpreet Kaur च्या रूपाने भारताला लागला मोठा झटका
भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या समेमीफायनमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यासाठी टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर देखील हा सामना खेळू शकणार नाहीये.
मंधाना सांभाळणा टीम इंडियाची धुरा
टीम इंडियाची सर्वात सिनियर खेळाडू हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) आजारपणामुळे बाहेर झाली तर टीमची कमान उपकर्णधार स्मृती मंधानाकडे सोपवली जाणार आहे. मंधानाने गेल्या सामन्यामध्ये तुफान फलंदाजी केली होती. तिने 56 बॉल्समध्ये 87 रन्सची खेळी केली होती. तिच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 156 होता.
सेमीफायनलमध्ये पावसाने खेळ केला तर...
जर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या सामन्यात पावसाने घोळ घातला आणि मिनिमम ओव्हर्सही नाही खेळवता आले तरी चिंतेची बाब नाही. कारण आयसीसीने सेमीफायनलच्या सामन्यासाठी खास रिझर्व डे ठेवला आहे. म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही, तर हा सामना 4 फेब्रुवारी रोजी तिथूनच सुरु होईल, ज्या ठिकाणहून थांबवण्यात आला होता.
जर या सामन्याच्या रिझर्व डे ला देखील निर्णय झाला नाही किंवा या दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही. कर ग्रुप स्टेजच्या पॉईंट्सच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. अशा स्थितीमध्ये ऑस्ट्रेलिया टीम फायनलमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. कारण ग्रुप एमध्ये ती पहिल्या स्थानावर होती.
दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग-11
टीम इंडिया
स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिगेज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकुर.
ऑस्ट्रेलिया टीम
मेग लॅनिंग (कर्णधार), बेथ मूनी, एलिसा हीली, एलिसा पेरी, एश्ले गार्डनर, ताहिलिया मॅक्ग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, एलाना किंग, मेगन शूट, डार्सी ब्राउन.