Ind vs Aus World Cup 2023 Final Shah rukh Khan video : वर्ल्ड कपचा फायनल सामना अहमदाबादमधील स्टेडियमवर रंगला. हा सामन्याचा आनंद घेण्यासाठी आणि भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांपासून बॉलीवूड जगतातील दिग्गज स्टेडियमवर आले होते. वर्ल्ड कप 2023 मधील सर्व सामन्यात विजयाची घोडदौड करत भारतीय संघाने फायनल गाठलं खरं पण त्यांना वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने शानदार खेळी करत सहाव्यांदा वर्ल्ड कप आपल्या खिशात घातला आहे. भारतीय संघाने वर्ल्ड कप गमावल्यानंतर भारतीय निराश झाले आहेत. (Ind vs Aus World Cup 2023 Final Shah rukh Khan Badshah s  that act for asha bhosle won the hearts of netizens video viral trending Now)


दिल खुश कर दिया!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दुसरीकडे मात्र शाहरुख खानच्या एका कृत्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. किंग खान मनानेही बादशाह असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये शाहरुख खानसह कुटुंब उपस्थिती होता. त्यासोबत गौरी खान, सुहाना आणि आर्यन खानही उपस्थितीत होते. रणबीर, दीपिकासह ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही मॅचचा आनंद लुटण्यासाठी आली होती. 


काय केलं बादशाहाने ?


शाहरुख खान आणि आशाताई मॅच बघत असताना त्यांनी चहा आणि काही खाण्याचा आस्वाद घेतला. त्यावेळी आशाताईंच्या बाजूला बसलेल्या किंग खानने त्यांच्या हातातील कप घेऊन तो फेकण्यासाठी घेतला. किंग खानचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं.



शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. बादशाहाच्या या कृत्याने नेटकरी आनंदी झाले आहेत. नेटकऱ्यांनी किंग खानचं कौतुक केलंय.