IND vs Ban : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची (India Tour Of Bangladesh 2022) रविवार 4 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात आधी वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना हा 4 डिसेंबरला शेरे बंगला स्टेडियममध्ये (Shere Bangla Stadium) खेळवण्यात येणार आहे. याआधीचा टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची भीती कायम आहे. या पहिल्या सामन्यात पाऊस होण्याची किती शक्यता आहे हे आपण जाणून घेऊयात. (ind vs ban 1st odi weather forecast head to head playing 11 team india bangladesh rohit sharma)


असं असेल हवामान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी सामन्याच्या दिवशी सामन्यादरम्यान पावसाची 1 टक्केही शक्यता नाही.  तसंच तापमानही 28 डिग्री असणार आहे. ढाक्यात यावेळेस थंड वातावरण आहे. त्यामुळे दव पडण्याची शक्यता आहे.


मैदानाची आकडेवारी 


शेरे ए बांगला स्टेडियममध्ये अखेरचा एकदिवसीय सामना हा मे 2021 मध्ये खेळवण्यात आला. या मैदानात 113 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा 53 सामन्यात विजय झाला आहे. तर पहिले बॉलिंग करणाऱ्या टीमने 59 वेळा विजय मिळवलाय.  शेरे ए बांगलातील पिच फिरकीपटूंसाठी मदतशीर आहे. 


टीम इंडियाने या स्टेडियमध्ये अखेरच्या एकदिवसीय सान्यात 105 धावा केल्या होत्या. यानंतरही भारताचा 47 धावाने विजय झाला होता. या सामन्यात सुटुअर्ट बिन्नीने  (Stuart Binny) 4 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.  मात्र पावसामुळे हा सामना 41 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. 


एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश


लिट्टन दास (कर्णधार), अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफीफ होसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद (दुखापतग्रस्त), हसन महमूद, इबादत होसैन, नसुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल होसैन शंटो, काजी, नूरुल हसन सोहन आणि शोरीफुल हसन (राखीव)


वनडे सीरिजसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.