IND VS BAN 1st Test Rishabh Pant Give Fielding Advice To Bangladesh : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात शनिवारी पहिल्या टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस पार पडत आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून खेळताना फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) आणि ऋषभ (Rishabh Pant)  पंतने दमदार खेळी करून भारताची धावांची आघाडी अधिक मजबूत केली. तिसऱ्या दिवशी पंत आणि गिल या दोघांनी मैदानात चौकार आणि सिक्सची आतिषबाजी करवून बांग्लादेशच्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फोडला. यावेळी बांग्लादेशचा कॅप्टन शांतो फिल्डर्स नक्की कुठे लावावे याबाबत संभ्रमात असताना फलंदाजी करणाऱ्या पंतने त्याला फिल्डिंग कशी लावायची याचा सल्ला दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


टीम इंडिया मजबूत स्थितीत : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला सामना हा चेन्नई येथे खेळवला जात असून यावर तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाचं वर्चस्व असल्याचं दिसतं आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी बांगलादेशच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 149 धावांवर रोखले. तर दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने 308 धावांची मजबूत आघाडी घेतली. तर तिसऱ्या दिवस सध्या सुरु असून शुभमन गिल आणि ऋषभ पंतने आतापर्यंत 100 हुन अधिक धावांची पार्टनरशिप केली आहे. 


ऋषभ पंतने शांतोला दिला सल्ला : 


ऋषभ पंत आणि शुभमन गिल दोघे मैदानात दमदार फलंदाजी करत होते. तेव्हा त्यांना रोखण्यासाठी नेमकी कशी फिल्डिंग लावावी याची रणनीती बांगलादेशचा कॅप्टन शांतो आखत होता. फिल्डिंग लावण्यासाठी शांतो जास्त वेळ घेत होता. तेव्हा फलंदाजी करत असलेल्या ऋषभने त्याला म्हंटले, "भाऊ एक काम कर एक फिल्डर इथे पण लाव.." ऋषभने दिलेला सल्ला शांतोने चक्क ऐकला आणि त्यानुसार एक फिल्डर ऋषभने सांगितलेल्या ठिकाणी लावला. हे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सर्वचजण हसू लागले.सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


हेही वाचा : तिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला


पाहा व्हिडीओ :



भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा