IND VS BAN 1st Test Jasprit Bumrah Wicket : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस पार पडत आहे. पहिल्या दिवशी भारताने अश्विन आणि जडेजाच्या जोरावर 339 धावांची आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजी करून त्यांनी बांगलादेशला 376 धावांची आघाडी मोडण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचे फलंदाज मैदानात आले खरे परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहने काहीही कळण्याच्या आत त्यांच्या दांड्या उडवल्या. सध्या बुमराहने घेतलेल्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज पार पडणार आहे. या टेस्ट सीरिजचा पहिला सामना सध्या चेन्नईत खेळवला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 376 धावांची आघाडी घेतल्यामुळे बांगलादेश समोर मोठे आव्हान होते. रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध पहिली ओव्हर टाकण्यासाठी बॉल टीमचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहकडे सोपवला. जसप्रीतने नेहमीप्रमाणे विश्वास सार्थ ठरवत ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ओपनिंग बॅट्समन शादमान इस्लाम याला बोल्ड आऊट केले. 


ओव्हरचा सहावा बॉल बुमराहने स्ट्राईकवर असलेल्या शादमान इस्लामच्या दिशेने टाकला. बॉल इतक्या वेगात आला की शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या शादमानला काहीही कळण्याच्या आत बॉल त्याच्या पॅडला लागून विकेटवर जाऊन आदळला. बुमराहने घेतलेली ही विकेट पाहून सर्वच चकित झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


हेही वाचा : IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video


 




भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा