IND VS BAN 1st Test 3rd Day :  भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज मधला पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जात आहे. चेन्नईतील या टेस्ट सामन्याचा आज तिसरा दिवस असून ऋषभ पंत पाठोपाठ टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू शुभमन गिलने सुद्धा शतक ठोकलं आहे. शुभमन गिलने 176 बॉलवर नाबाद 119 धावा केल्या. हे शुभमनचं टेस्ट क्रिकेटमधील चौथं शतक होतं. 


शुभमन गिलचं चौथ शतक : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश विरुद्ध फलंदाजीच्या पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये युवा खेळाडूंनी टीम इंडियाची बाजू सांभाळली. तिसऱ्या दिवशी पंत आणि गिलने जवळपास 150 हुन अधिक धावांची पार्टनशीपकरून टीम इंडियाची आघाडी ५०० धावांपर्यंत पोहोचली. शुभमन गिलला बांगलादेश विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये एकही धाव करता आली नव्हती. हसन महमुदने त्याला डकआउट केले होते. मात्र दुसऱ्याच इनिंगमध्ये गिलने कमबॅक केलं आणि 176 बॉलवर नाबाद 119 धावा केल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 4 सिक्स लगावले. शुभमनचं टेस्ट क्रिकेटमधील हे चौथं शतक ठरलं.  टीम इंडियाने आता बांगलादेशला विजयासाठी 508 धावांचं आव्हान दिलं आहे. 


व्हिडीओ : 



भारताची प्लेईंग 11:


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज


बांगलादेशची प्लेईंग 11: 


शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा