IND Vs BAN 2nd ODI: दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. हा पराभव टाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वत: मैदानात उतरला होता. त्याने शेवटी मैदानात उतरून बांगलादेशच्या तोंडातला विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला.मात्र यात तो अपयशी ठरला. तरीही अपयशी झूंज देऊन सुद्धा त्याने करोडो क्रिकेट फॅन्सची मन जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा: उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी, बॅट्समनची दांडीच केली गुल,पाहा VIDEO 


रोहितची अर्धशतकी खेळी 


बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला. कर्णधार रोहित शर्माची 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी व्यर्थ गेली. शेवटच्या चेंडूवर 6 धावा करण्यात रोहित शर्माला अपयश आलं. त्यामुळे भारताचा 5 धावांनी पराभव झाला. 


रेकॉर्ड काय? 


टीम इंडिया पराभवाच्या छायेत असताना दुखापतग्रस्त रोहित शर्माने (Rohit Sharma)  मैदानात उतरण्याचा निर्णय़ घेतला होता.यावेळी रोहित शर्माने 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली.या खेळीत त्याने 3 फोर आणि 5 सिक्स लगावले होते. हे 5 सिक्स मारून त्याने 500 सिक्सरचा पल्ला गाठलाय. आता तो 500 सिक्स ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादित जाऊन बसला आहे.मात्र या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.


सर्वाधिक सिक्स कोणी ठोकलेत?


सर्वाधिक सिक्स ठोकण्याच्या यादीत क्रिस गेल (Chris Gayle) अव्वल स्थानी आहे. त्याने 553 सिक्स ठोकले आहेत. तर रोहित शर्मा (Rohit Sharma)  दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.त्याने 500 सिक्स ठोकलेत. वेस्ट इंडिजच्या महान क्रिस गेलनंतर हा टप्पा गाठणारा रोहित हा पहिला भारतीय आणि खेळाच्या इतिहासातील दुसरा खेळाडू आहे.


 रोहितनंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी तीन नंबरवर आहे, त्याने 476 सिक्स ठोकले आहेत.  आफ्रिदी ब्रॅडन मॅक्युलक चौथ्या स्थानी आहे, त्याने 398 सिक्स मारले आहेत.  


दरम्यान बांगलादेशने (india vs bangladesh) दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून 2-0 ने मालिका खिशात घातली आहे. आता तिसऱ्या वनडे सामना कोण जिंकतो हे पाहावे लागणार आहे.