IND VS BAN 2nd Test Kanpur : भारत विरुद्ध बांगलादेश (India VS Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना कानपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 27 ऑक्टोबरपासून या सामन्याला सुरुवात झाली होती, परंतु आधी पाऊस आणि आता मैदान ओल असल्याने तिसऱ्या दिवसाचा सामना सुद्धा रद्द करण्यात आला. कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवरील अपुऱ्या सुविधांमुळेच सामना खेळवला गेला नाही असे म्हणत फॅन्सनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे. 


सलग दोन दिवशी सामना रद्द : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27  सप्टेंबर कानपुर टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे भारत - बांगलादेश सामन्यात केवळ 35 ओव्हर खेळवले गेले. यात टीम इंडियाने तीन विकेट्स घेतल्या तर बांग्लादेशने 107 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सामना सुरु होऊ शकला नाही आणि एकही बॉल न खेळवता तो रद्द करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पावसाने काहीशी विश्रांती घेतली तरी सलग दोन दिवस पाऊस पडल्याने मैदान ओल होतं. ग्रीन पार्क स्टेडियम हे फार जुनं स्टेडियम असल्याने येथे ड्रेनेज सिस्टम इतर अद्यावत स्टेडियमच्या तुलनेत तेवढी चांगली नाही. याचा परिणाम तिसऱ्या दिवशी जाणवला आणि पाऊस नसूनही केवळ मैदान ओल असल्याने सामना रद्द करण्यात आला.  यावरून आता फॅन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 


हेही वाचा : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर


 


व्हायरल व्हिडीओ : 



कानपूर स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याने तिसऱ्या दिवशीही सामना रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी फॅन्सने म्हंटले, "कानपुर येथील हे स्टेडियम इतकं जुनं आहे की यात कोणतंही ड्रेनेज सिस्टम नाहीये. आज पाऊस अजिबात नाहीये तरी अजूनही कव्हर्स आहेत. कोणतं वेगळं ग्राउंड असतं तर तिथे अजूनपर्यंत कव्हर्स निघाले असते, पाणी निघून सर्व स्वच्छ झालं असतं आणि सामना सुरूही झाला असता. बेकार ग्राउंड आहे मला वाटतं नाही कानपूरला यापुढे कोणताही सामना खेळण्याची परवानगी मिळेल". 


व्हिडीओ खाली कमेंट्स करत फॅन्सनी बीसीसीआयला झापलं. एका फॅन्सनी लिहिले बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे तरी सुद्धा भारतातील स्टेडियमची अशी अवस्था आहे. तर एका यूजरने लिहिले की, बीसीसीआयने थोडे पैसे खर्च करून कानपुर स्टेडियमच्या पायाभूत सुविधांवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे.