Ban vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत
Ban vs Ind, 2nd Test : आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करते हे पाहावे लागणार आहे.
Ban vs Ind, 2nd Test : टीम इंडियाच्या (Team India) रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशने गुडघे टेकले आहे. बांगलादेश संघाचा पहिला डाव 227 धावावर ऑल आऊट झाला आहे.टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) आणि उमेश यादवने (umesh yadav) प्रत्येकी 4 विकेट घेतले आहेत.त्यामुळे आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे. आता टीम इंडिया पहिल्या डावापर्यंत पोहोचते हे पाहावे लागणार आहे.
ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र बांगलादेशची सुरूवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाच्या (Team India) जयदेव उनाडकटने ताहिर हसनला केए राहुलकडे झेलबाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. यानंतर अश्विन (ravichandran ashwin) आणि उमेश यादवने (umesh yadav) एका मागून एक विकेट घेत बांगलादेशला ऑल आऊट केले.
बागंलादेशकडून मोमिनल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. या खेळाडूव्यतिरीक्त एकाही खेळाडूला 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही. त्यात रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) आणि उमेश यादवच्या (umesh yadav) प्रत्येकी 4 विकेटने बांगलादेश कोलमडली आणि 227 धावावर ऑल आऊट झाली.
दरम्यान आता टीम इंडिया फलंदाजीस उतरणार आहे.टीम इंडिया आता पहिल्या डावात किती धावसंख्या उभारतो हे पाहावे लागणार आहे.
टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर.के. अश्विन, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज
बांगलादेश टीम : शकीब-हाल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदीन हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खालिद अहमद