IND VS BAN 2nd Test Match Kanpur : चेन्नई येथे झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून तब्बल 280 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी मिळवली. पाकिस्तानचा टेस्ट सिरीजमध्ये पराभव करणाऱ्या बांगलादेशच्या टीमला टीम इंडियाने घाम फोडला. आता सीरिजमधील दुसऱ्या टेस्ट सामन्यातही टीम इंडिया बांगलादेशला हरवून क्लीन स्वीप देण्याचा करण्याचा प्रयत्न करेल. 


कधी आणि कुठे रंगणार सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज होणार आहे. यातील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पार पडला. तर दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होईल. 27 सप्टेंबर पासून दुसऱ्या टेस्टला सुरुवात जाणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केलाय. पहिल्या सामन्यात निवडलेल्या टीम इंडियाने उत्तम परफॉर्मन्स केल्याने बीसीसीआयने टीममध्ये कोणतेही बदल न करता हीच टीम कानपुर टेस्ट सामन्यासाठी सुद्धा जाहीर केलीये.  


हेही वाचा : Video: मॅचनंतर बायकोने घेतली अश्विनची मजेशीर मुलाखत, शतकवीर अश्विन पत्नीच्या प्रश्नांसमोर क्लिन बोल्ड


 


दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघ :  


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.


भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी टेस्ट कुठे पाहता येणार फ्री? 


भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा शुक्रवार 27 सप्टेंबर पासून सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स 18 चॅनेलवर दाखवण्यात येईल. तर डिजिटल यूजर्स जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर सुद्धा याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. भारत - बांगलादेश दुसरा टेस्ट सामना हा डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर फ्रीमध्ये लाईव्ह पाहता येईल. जे डीडी स्पोर्ट्स चॅनेल केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित होईल तेथे भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही.