IND vs BAN 3rd ODI : टीम इंडियाचा स्टार आणि युवा फलंदाज ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत द्विशतक ठोकले आहे. ईशानने 131 बॉलमध्ये हे द्विशतक मारले आहे. ही मोठी खेळी करून त्याने टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (ishan kishan) द्विशतक ठोकले आहे.ईशानने 131 बॉलमध्ये हे द्विशतक पुर्ण केले आहे.आणि हे द्विशतक करून तो 210 धावांवर आऊट झाला आहे. या या खेळीत त्याने 24 फोर आणि 10 सिक्स मारले आहेत. त्याच्या या खेळीने टीम इंडिया सर्वांच्च धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे.  


हे ही वाचा :  ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक


रोहितचा रेकॉर्ड ब्रेक 


रोहितने (Rohit sharma) वनडे सामन्यात तीनदा सर्वांच्च स्कोर केला आहे. यामध्ये त्याने एकदा 208 तर दुसऱ्यांदा 209 धावा ठोकल्या होत्या. तर ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्ध डबल सेंच्यूरी (Double Century) ठोकून रोहितचा रेकॉर्ड मोडला आहे.ईशानने 160 च्या स्ट्राईकने 210 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे ईशानने 208 आणि 209 धावा ठोकल्याचा विक्रम मोडलाय. विशेष म्हणजे 131 इनिंग्समध्ये त्याने डबल सेंच्यूरी ठोकली आहे. तर रोहितने 153 इनिंगमध्ये डबल सेंच्यूरी ठोकली होती. 


तरीही रोहितच नंबर वन 


वनडे सामन्यात रोहितने (Rohit sharma) तीनदा डबल सेंच्यूरी ठोकली आहे. एका वनडे सामन्यात सर्वांधिक धावा ठोकण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. रोहितने श्रीलंकेविरूद्ध 264 धावा ठोकल्या होत्या. हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणालाच ब्रेक करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरूद्ध 208 आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध 209 धावा केल्या होत्या.ईशान किशनने 210 धावा करून हा रेकॉर्ड तोडलाय. 


दरम्यान ईशान किशनच्या (ishan kishan) या डबल सेंच्यूरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.