Ind vs Ban 3rd ODI Live: भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे.  बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली. इशान किशनने 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची धडाकेबाज खेळी केली. या सामन्यामध्ये टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.