Ind vs Ban test : भारत आणि बांगलादेशमधील कसोटी सामन्यामध्ये आता रंगत आलेली पाहायला मिळत आहे. भारताच्या 512 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून बांगलादेशनच्या 272 धावांवर 6 विकेट्स गेल्या आहेत. बांगलादेशचा पदार्पणवीर झाकीर हसन (Zakir Hasan Hundread) याने शतक करत मोठा विक्रम नावावर केला आहे. (ind vs ban first test Bangladeshs Zakir Hasan scored a century in the debut match latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांना त्याने चांगलंच झगडवलं, 219 चेंडू खेळत 13 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने त्याने शतक पूर्ण केलं. बांगलादेशला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. झाकीर हसन हा बांगलादेशकडून कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशकडून कसोटी पदार्पणात पहिले शतक अमिनुल इस्लामचे आहे. ज्याने 2000 मध्ये ढाका येथे भारताविरुद्ध हे शतक केले होते. 


मोहम्मद अश्रफुलने 2001 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 114 धावांची इनिंग खेळली होती.  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अबुल हसन आहे. ज्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खुलना येथे 113 धावा केल्या होत्या आणि आता झाकीर हसनने चट्टोग्राममध्ये भारताविरुद्ध पदार्पणात शतक झळकावले होते.  


दरम्यान, बांगलादेशला विजयासाठी 241 धावांची गरज आहे. तर दुसरीकडे भारताला 4 विकेट्स घ्यायच्या आहेत. बांगलादेशचे शाकिब अल हसन नाबाद 40 आणि मेहेंदी हसन नाबाद 9 धावांवर मैदानात आहेत. उद्याच्या दिवसाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.