मुंबई : टीम इंडियाला (Indian Cricket Team) मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे बांगलादेश (IND vs BAN) विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. जाडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे जाडेजाला या सीरिजमधून माघार घ्यावी लागली आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जडेजाला दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं. त्यानंतर आता पुन्हा दुखापत आडवी आल्याने जाडेजाला आणखी किती वेळ वाट पहावी लागणार, असा सवाल क्रिकेट चाहते विचारत आहेत. (ind vs ban odi series team india all rounder ravindra jadeja ruled out due to knee injurey after t 20 world cup 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे.  एकदिवसीय मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर टेस्ट सीरिज होणार आहे.  या दोन्ही सीरिजसाठी जाडेजाची निवड करण्यात आली. मात्र आता जाडेजा बाहेर पडला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी शाहबाज अहमदला संधी मिळू शकते.


बांगलादेश विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल. 


बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.