IND VS BAN : टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्घ (India vs Bangladesh) दोन सामन्यांचा कसोटी सामना खेळतेय. यामध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकून कसोटीत1-0 ने आघाडी घेतलीय. त्यात आता दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला सुरू होणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे (team india) दोन खेळाडू शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. 



 बीसीसीआयच्या ट्विटमध्ये काय?


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विट करून याबाबतचा दुजोरा दिला आहे. 


कर्णधाराच्या अंगठ्याला दुखापत


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) डाव्या अंगठ्याच्या दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघातून बाहेर झाला होता. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. रोहित शर्माची दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे वैद्यकीय पथकाचे मत आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी तो उपलब्ध असणार नाही आहे, असे बीसीसीआयने पत्रात म्हटले आहे.


रोहित शर्मासह (Rohit Sharma) गोलंदाज नवदीप सैनीलाही (Navdeep Saini) दुखापत झाली आहे. नवदीप सैनी पोटाच्या स्नायूंच्या ताणामुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. हे दोन खेळाडू बांगलादेश विरूद्धची शेवटची कसोटी खेळू शकणार नाही आहेत. 


दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेट किपर), केएस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मो. सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.