IND vs BAN : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 च्या (ICC T20 World Cup) 35 व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (ind vs ban) 5 धावांनी पराभव केला. अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या सुपर-12 च्या ग्रुप-2 सामन्यात बांगलादेशने (bangladesh) नाणेफेक (Toss) जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. भारताकडून केएल राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतके झळकावली. पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे षटकांमध्ये कपात झाली. बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 16 षटकांत 6 बाद 145 धावाच करू शकला. भारत आणि बांगलादेश (ind vs ban) यांच्यात टी- 20 विश्वचषकाचा (T20 World Cup) सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने (India) बाजी मारली, पण बांगलादेशने (bangladesh) कडवी टक्कर दिली. सामना संपेपर्यंत बांगलादेशच्या खेळाडूंनी हार मानली नाही आणि क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळाला. (ind vs ban t20 world cup bangladesh Nurul Hasan accuse virat kohli of fake fielding fake throw during last over)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन याने बुधवारी भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग' केल्याचा आरोप केला. त्यासाठी बांगलादेशच्या संघाला दंड म्हणून पाच धावा मिळायला हव्या होत्या, असेही नुरुलने म्हटलं आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सुपर 12 च्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशचा पाचच धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता विराटच्या क्षेत्ररक्षणावरुन नवा वाद उफाळून आलाय.



सामन्यानंतर बांगलादेशचा यष्टिरक्षक नुरुल हसनने विराट कोहलीवर खोट्या क्षेत्ररक्षणाचा आरोप करत अंपायरने विराट कोहलीच्या 'फेक फिल्डिंग'कडे दुर्लक्ष केले, अन्यथा बांगलादेशला पेनल्टी म्हणून पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, असे म्हटले आहे. नुरुल हसनच्या वक्तव्यानंतर क्रिकेट चाहते सामन्यात नक्की काय झालं असेही विचारत आहेत तसेच विराट कोहलीवर हे आरोप का करण्यात आले? असेही म्हटलं आहे.


Ind vs Ban : 'भारत जिंकला तर माझं नाव नरेंद्र मोदी ठेवेन', पाकिस्तानी चाहती हे काय बोलून बसली!


ESPNCricinfo च्या वृत्तानुसार बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान सातव्या षटकात हा सर्व प्रकार घडला आहे. जेव्हा बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासने अक्षर पटेलच्या चेंडूवर डीप ऑफ साईडच्या दिशेने शॉट खेळला. पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीच्या बाजूने हा चेंडू गेला. अर्शदीप सिंगने डीपवर क्षेत्ररक्षण करताना तो स्टंम्पच्या दिशेने फेकला. मात्र यादरम्यान पॉइंटवर उभ्या असलेल्या कोहलीनेही चेंडू विकेटवर फेकण्याचे नाटक केले. त्यावेळी अम्पायर आणि फलंदाज यांच्या ही बाब लक्षात आली नाही. यामुळे मैदानावरील अंपायर मरे इरास्मस आणि ख्रिस ब्राउन यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, बांगलादेशचा यष्टिरक्षक नुरुलने सामन्यानंतर त्याचा उल्लेख केला.


सामन्यानंतर नुरुलने, विराटच्या फेक थ्रोमुळे संघाला पेनल्टीच्या 5 धावा मिळायला हव्या होत्या असे म्हटले आहे. "आम्ही सर्वांनी पाहिले की जमीन पूर्णपणे ओली झाली आहे. या सर्व गोष्टींबद्दल बोलले जात असताना, सामन्यादरम्यान एक फेक थ्रोही झाला होता. त्यामुळे आम्हाला पेनल्टीमधून पाच धावा मिळाल्या असत्या. त्याचाही आपल्याला फायदा होऊ शकला असता पण दुर्दैवाने तसे झाले नाही," असे नुरुलने म्हटलं आहे.


आयसीसीचा नियम काय म्हणतो?


क्रिकेटच्या  41.5.1 कायद्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून जाणूनबुजून फलंदाजाला विचलित करणे, फसवणूक करणे किंवा फलंदाजामध्ये हस्तक्षेपाचा संदर्भ देण्यात आला आहे. जर अंपायरला असे वाटत असेल की हा नियम एखाद्या खेळाडूने मोडला, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला दंडाच्या म्हणून पाच अतिरिक्त धावा मिळू शकतात.


यासाठी शिक्षा काय आहे?


यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला फेक फिल्डिंगची शिक्षा मिळते. नियम 41.5.6 नुसार, गोलंदाजी अंतिम पंच फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा दंड घोषित करतात. यासोबतच त्या चेंडूवर काढलेल्या धावाही फलंदाजी करणाऱ्या संघाला दिल्या जातील. याशिवाय पुढचा चेंडू कोणाला खेळायचा हे फलंदाज निवडतो.


हा नियम कधी आला? 


आयसीसीने 2017 मध्ये फेक फिल्डिंगचा नियम लागू केला होता. 2017 मध्ये हा नियम लागू करण्यामागचे कारण MCC चे क्रिकेट व्यवस्थापक नियम फ्रेझर स्टीवर्ट यांनी दिले होते. यासोबतच बनावट क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजांना दुखापत होण्याचाही धोका होता


दरम्यान, डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाने हा सामना पाच धावांनी जिंकला. पण विराटच्या चुकीमुळे पाच धावा पेनल्टी मिळाल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.