IndvsBan : भारत आणि बांगलादेशमधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. हा सामना चितगाव येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे. मात्र सामन्याच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे कर्णधार सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शाकिबला खांद्याच्या दुखापतीमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे शाकिबच्या दुखापतीमुळे तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत काही स्पष्टता नाही. सकाळच्या सरावासाठी शाकिब आला मात्र त्याला रूग्णालयात दाखल केलं. 
 
शाकिबला गंभीर दुखापत झाली नाही. मैदानावर त्याला बाहेर नेण्यासाठी दुसरं काही उपलब्ध नव्हतं म्हणून थेट रूग्णवाहिकेने त्याला नेण्यात आलं होतं. काही वेळानंतर शाकिब माघारी परतला. शाकिब उद्याच्या सामन्यासाठी फिट नसेल कदाचित बांगलादेशच्या कर्णधाराची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्याची शक्यता आहे. 


कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ: शाकिब अल हसन, अनामूल हक, इबादत हसन, खालिद अहमद, लिटन दास, हसन जॉय, मेहदी हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, नजमुल शांतो, नुरुल हसन, रहमान रझा, शरीफुल इस्लाम, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, यासिर अली, झाकीर हसन.


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.