IND vs BAN Test Series : भारताकडे आजच्या घडीला उत्तम वेगवान गोलंदाजांचा (Pace bowlers) ताफा उपलब्ध आहे. एक वेगवान गोलंदाज जायबंदी झाला, तर त्याची जागा घ्यायला, त्याच तोडीचा दुसरा गोलंदाज तयार असतो. मागच्या चार-पाच वर्षात भारताच्या वेगवान गोलंदाजीच्या चमूमध्ये बरीच प्रगती झाली आहे.  अशातच आता भारत आणि बांगलादेशच्या (IND vs BAN ) संघांमध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट (team India) नियामक मंडळाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या मालिकेसाठी जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) जागी एका अशा खेळाडूला संधी दिली आहे जो आपला शेवटचा कसोटी सामना 12 वर्षांपूर्वी खेळला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहम्मद शमी टी20 (t20) विश्वचषकानंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर आराम देण्यात आलेला. तर, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड केली गेलेली. मात्र, संघ बांगलादेशला रवाना होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला व वनडे मालिकेतून बाहेर पडला.  त्याच्या जागी कसोटी संघात मुकेश कुमार किंवा उमरान मलिक यांचा समावेश केला जाऊ शकतो अशी बातमी समोर आलेली. मात्र, त्यात कोणतेही तथ्य एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याच्या जागी जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) याला बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे.


वाचा: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले... 


यशस्वी गोलंदाजांपैकी एक


जयदेव उनाडकत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर आपला पहिला व अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तसेच त्याने भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरेशी संधी मिळाली नसली तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत 96 प्रथमश्रेणी सामने खेळताना 353 बळी मिळवले आहेत. तर, 2019 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा तो कर्णधार राहिला आहे.