IND vs ENG 1st Test: भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लड थबकले, 20 ओव्हरमध्ये काढले एवढेच रन
भारतीय संघाने चांगली सुरुवात केली असून गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड संघाला सुरुवात अगदीच सावधपणे करावी लागली आहे.
चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या सीरिजमधील आज पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. हा सामना चेन्नईतील चेपम मैदानात सुरू आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडच्या संघानं पहिल्यांदा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात कर्णधार विराटनं सुरुवातीलाच काही बदल केले. भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला नमतं घ्यावं लागलं.
भारतीय संघातील गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लडच्या संघानं फलंदाजीची सुरुवात अगदी सावधपणे केली. संघाला तब्बल 11 ओव्हरमध्ये 25 धावा काढण्यात यश आलं. ईशांत आणि बुमराह गोलंदाजी सांभाळत आहे.
इंग्लंडची धावसंख्या 11 षटकांमध्ये केवळ 25 धावा करण्यात यश आलं आहे. डोमिनिक सिब्ली रोरी बर्न्स सध्या खेऴत आहे. 25/0 असा सध्याचा स्कोअर आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी टीम इंडियाला दिली.
अवघ्या 20 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 0 गडी राखून 51 धावा अशी झाली आहे. डोमिनिक सिब्ली (24 धावा) आणि रोरी बर्न्स (23 धावा) केल्या आहेत.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानं इंग्लंडच्या संघाला सतर्क राहून खेळावं लागत आहे. पहिला सामना खिशात घालण्यासाठी भारतीय संघानं कंबर कसली आहे. तर इंग्लंडला सावध खेळणं सध्या तरी भाग असल्यानं आता सामना आणखीन रंजक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.