चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सीरिजमधील पहिला कसोटी सामना आज चेन्नई इथे खेळवला जात आहे. हा कसोटी सामना चेन्नईतील चेपम मैदानात होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांना नव्या चेंडूची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्लेइंग इलेवनमध्ये कुणाला संधी? 
भारतीय संघातून रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम खेळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड संघाकडून रोरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डेनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अॅण्डरसन खेळणार आहेत.




इंग्लंडच्या संघाला चेन्नईतील मैदानात हरवण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे. 4 कसोटी सामन्यांपैकी तीन सामने जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तरच भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी न्यूझिलंडसोबत खेळण्याची संधी मिळेल.


भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांमध्ये जर भारतीय संघ जिंकला तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यासाठी पोहोचेल. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझिलंड असा होऊ शकतो. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पोहोचण्याचं भारतीय संघासमोर मोठं आव्हान आहे.