चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिला सामना सुरू आहे. चेपॉक मैदानात हा सामना खेळवला जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या संघानं तुफान फलंदाजी गेली आहे. त्यांच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी होत असल्याचं दिसत आहे. तर भारतीय संघाचे गोलंदाज विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघात प्लेइंग इलेवनसाठी काही बदल करण्यात आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यासाठी स्पिनर शाहबाज नदीमला खेळण्याची संधी देण्यात आली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, स्पिनर अश्विन संघात गोलंदाजी करत आहेत. मात्र यावेळी कुलदीप यादवला प्लेइंग इलेवनमध्ये संधी दिली नाही. 


कुलदीपला संधी का दिली नाही? यावरून आता क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांनी सवाल उपस्थित करत कर्णधार विराह कोहोलीवर टीकाही केली आहे. कुलदीपला संघात खेळण्याची संधी द्यायला हवी होती. असा सूर क्रिकेटप्रेमींचा आहे. इंग्लंड संघाच्या फलंदाजीसमोर भारतीय संघातील गोलंदाजांना अपयश येत असल्याचं दिसत आहे. 


तर शाहबाज नादीमला संघात खेळण्याची पुन्हा संधी मिळाली होती. मात्र त्याच्या बॉलवर इंग्लंडचा संघ आरामात खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर इंग्लंडच्या संघाला तंबूत पाठवण्याचं आव्हान गोलंदाजांसमोर आहे. तर शाहबाज नादीमवर दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा दबाव आहे. 


कुलदीप यादवला न खेळवल्यानं कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयावर गौतम गंभीर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांना तीन स्पिनर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. कुलदीपने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी खेळली होती.