मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिला सामना नुकताच पार पडला. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर दोघंही गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार? सामना कुठे होणार किती वाजता  होणार जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरा वन डे सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर 26 मार्च रोजी दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक 1 वाजता होईल अशी माहिती मिळाली आहे. मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघात खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 


कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेवन टीम
विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उप-कर्णधार) शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, के एल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर


हिटमॅन रोहित शर्मा आणि श्रेय़स अय्यर दोघंही जखमी झाल्यामुळे आता दोघांनाही वन डे सीरिजसाठी विश्रांती दिली जाणार आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात या दोघांऐवजी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवनं शेवटच्या टी 20 सामन्यात कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा सूर्यकुमारची बॅट तुफान फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाली आहे.