IND VS ENG: हेलिकॉप्टरमधून सामन्याचा आनंद घेत पंतप्रधान मोदी म्हणाले...
पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत खेळल्या जाणार्या दुसर्या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला.
चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. चेन्नईतील चेपॉकमध्ये सध्या दुसऱ्या सामन्यातील दुसरा डाव सुरू आहे. पहिला डाव भारतीय संघ जिंकला आहे. तर भारतीय वेगवाग गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या 134 धावा काढून तंबूत धाडलं. दुसऱ्या डावात आता भारतीय संघाची फलंदाजी सुरू आहे.
पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत खेळल्या जाणार्या दुसर्या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमधून जात असताना त्यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्याला सुंदर कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
पहिल्या डावात 134 धावा काढून इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू तंबूत परतले. भारतीय संघातील गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा धुव्वा उडाला. तर दुसऱ्या डावातही आपली तुफान फलंदाजी सुरू ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड 1-0 असा स्कोअर होता.
या कसोटीमध्ये भारतीय संघाला यश मिळेल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. पहिल्या डावात भारतीय संघाने 329 धावा केल्या. ऋषभ पंत 58 धावा करुन टीम इंडियासाठी नाबाद राहिला. त्याचवेळी रोहित शर्माने सर्वाधिक 161 धावा केल्या. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने 67 धावा केल्या.