मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वन डे सामना पुण्यातील मैदानावर सुरू आहे. या सामन्या दरम्यान एक प्रसंग घडला आणि हा प्रसंग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्यानं भर मैदानात सामन्यादरम्यान हात जोडले आणि त्यानंतर दंडवत घातला. हार्दिकच्या हात जोडण्यामागे आणि बेन स्टोक्स आऊट होण्यामागे नेमकं तंत्र काय हे जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना सुरू असताना क्रिझवर बेन स्टोक्स खेळत होता. त्याची तुफान फलंदाजी सुरू असतानाच 5 व्या षटकादरम्यान स्टोक्सनं टोलवलेला चेंडू हार्दिक पांड्यानं कॅच घेतला. मात्र चेंडूचा वेग खूप असल्यानं तो हार्दिकच्या हातून सुटला आणि स्टोक्स आऊट होण्यापासून वाचला. त्यामुळे मैदानात सर्वांचीच निराशा झाली. 





त्यानंतर 11 व्या ओव्हरदरम्यान टी नटराजननं गोलंदाजी सुरू केली. टी नटराजनने स्टोक्सला बाद केलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. टी नटराजननं स्टोक्सला आऊट केल्यानंतर हार्दिक पांड्याने मैदानात हात जोडून टी नटराजनचे आभार मानले आहेत. स्टोक्सला अवघ्या 35 धावांवर थांबवणाऱ्या नटराजनला हार्दिक पांड्यानं दंडवत घालत त्याचे हात जोडून आभार मानले. हार्दिक पांड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.