मुंबई : इंग्लंड विरुद्ध वन डे सीरिज सुरू आहे. दुसरा व डे सामना 100 धावांनी गमावल्यानंतर आता तिसऱ्या वन डेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने वन डे सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे तिसरा सामना कोण जिंकणार याची उत्सुकताही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दुसऱ्या वन डेमध्ये ऋषभ पंत काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या वन डेमधून त्याला बाहेर बसवलं जाईल अशी चर्चा आहे. तर त्याची जागा रोहितचा लाडका खेळाडू घेणार असल्याचं सांगितलं जातं.  


कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर म्हणून ओळखला जातो. पण वन डे किंवा टी 20 मध्ये पंतला फार चांगली कामगिरी करता आली नाही. 


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात पंत खाते न उघडता परतला. पंत लवकर बाद झाल्यामुळे टीमची मधली फळी पूर्णपणे डळमळीत झाली. पंतला आता तिसऱ्या वन डेतून वगळले जाऊ शकते.


इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात ऋषभ पंतच्या जागी ईशान किशनचा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ईशाननं आयपीएलमध्ये उत्तम फलंदाजी केली आहे. पंतऐवजी ईशान किशनला मधल्या फळीत खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.


दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली असून 17 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यातून मालिकेचा निकाल लागणार आहे.