मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडची पहिली बॅटींगला उतरणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना जिंकूण कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 वर्षांचा दुष्काळ संपवणार
ओल्ड ट्रॅफर्ड वनडे जिंकून टीम इंडियाला 8 वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे. वास्तविक, भारताने इंग्लंडमध्ये 8 वर्षांपासून एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. टीम इंडियाने शेवटची वनडे मालिका २०१४ मध्ये इंग्लंडमध्ये जिंकली होती. तेव्हा एमएस धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. भारताने ती मालिका ३-१ ने जिंकली.


पिच रिपोर्ट 
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी इंग्लंडमधील फिरकीपटूंसाठी सर्वोत्तम खेळपट्टी मानली जाते. मात्र, वेगवान गोलंदाजांनाही येथे उसळी मिळते. अशा स्थितीत गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. तथापि, येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 6 वेळा 290+ धावा केल्या आहेत.


इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (सी/डब्ल्यू), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कारर्स, रीस टोपले


भारताची प्लेइंग इलेव्हन
 रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा