मँचेस्टर : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा आऊट ऑफ फॉर्म कायम राहीला आहे.इंग्लंड विरूद्धच्या शेवटच्या सामन्यातून विराट फ्लॉप ठरला आहे. अवघ्या 17 धावांवर तो बाद झाला आहे. त्यामुळे विराट आऊट ऑफ फॉर्म आता टीम इंडियासाठी अडचणीचा बनताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने 259 धावा ठोकल्या आहेत. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन 1 आणि रोहित शर्मा 17 धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीरांची झटपट विकेट पडल्यानंतर विराट कोहली डाव सावरेल अशी चाहत्यांनाच अपेक्षा होती. मात्र अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कारण संघाला खरी गरज असताना विराट कोहली बाद झाला आहे.


रीस टोपलेच्या बॉलवर विराट 17 धावांवर बाद झाला.मोठी खेळी करण्यास अपयशी ठरल्याने त्याचा ऑफ फॉर्म कायम राहीला आहे. 


वनडे मालिकेत अपयश
विराट कोहलीला इग्लंडविरूद्ध टेस्ट सामन्यानंतर आता वनडे सामन्यात अपयश आले आहे. इग्लंडविरूद्ध पहिला सामना भारताने जिंकला. या सामन्यात विराटला संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळून सुद्धा विराट 16 धावांवर बाद झाला. तर आजच्या तिसऱ्या सामन्यात तो 17 धावांवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या खेळावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होतेये. कारण गेल्या अडिच वर्षापासून त्याने शतक ठोकले नाहीए. 


 


दरम्यान सध्या रिषभ पंत आणि सुर्यकुमार यादव क्रिझवर आहेत. टीम इंडीया हा सामना जिंकून मालिका खिशात घालते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.