Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान मोठा वाद झाला. खरं तर, जेव्हा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या चेंडूवर केएल राहुलला आउट दिलं गेलां, तेव्हा त्याने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण आता त्याला असे केल्याबद्दल शिक्षा भोगावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICC कडून राहुलला शिक्षा


लंडनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंचांच्या निर्णयाशी असहमती दर्शविल्याबद्दल भारतीय सलामीवीर केएल राहुलला रविवारी त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला. भारतीय डावाच्या 34 व्या षटकात जेव्हा डीआरएस घेण्यात आला तेव्हा थर्ड अंपायरने त्याला आऊट दिले. अशा प्रकारे त्याने आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आचारसंहितेच्या लेव्हल वनचे उल्लंघन केले. राहुलने 101 चेंडूत 46 धावा केल्या.


आयसीसीच्या प्रसिद्धीनुसार, 'राहुलला आयसीसीचे खिलाडू आणि इतर स्टाफच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केले आहे. जो अंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरच्या निर्णयाविरोधात असहमती दर्शवल्या संदर्भात आहे.' एक डिमेरिट अंक देखील राहुलच्या अनुशासनात्मक रेकार्डमध्ये जोडला गेला आहे. 24 महिन्यातला हे त्याचं पहिलं उल्लंघन आहे.


राहुलने गुन्हा केला कबूल


राहुलने गुन्हा कबूल केला आहे आणि आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफरीच्या ख्रिस ब्रॉडने प्रस्तावित केलेला दंड स्वीकारला आहे. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स वार्फ, तिसरे अंपायर मायकेल गफ आणि चौथे अंपायर माइक बर्न्स यांनी आरोप निश्चित केले. लेव्हल वनच्या उल्लंघनामुळे कमीतकमी अधिकृत दंड आणि जास्तीत जास्त दंड खेळाडूच्या फीच्या 50 टक्के आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स असतो.


रोहित-पुजाराची शानदार फलंदाजी


इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषतः रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा. रोहितच्या बॅटने परदेशी भूमीवर पहिले शतक ठोकले. रोहितने 127 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. याशिवाय पुजाराने 61 धावाही केल्या. केएल राहुलच्या बॅटमधून 46 धावा आल्या.