मुंबई : टीम इंडिया आणि इग्लंडमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातला पहिला दिवस टीम इंडियाच्या खेळाडूंनी गाजवला. पहिला दिवसअखेर भारताने 7 विकेट गमावून 338 धावा ठोकल्या आहेत. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ होणार आहे, मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होण्याची शक्यता आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया आणि इग्लंडमधील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. पहिल्या दिवशी सामन्यामुळे खेळ उशिराने सुरु झाला होता. आता दुसऱ्या दिवसावर देखील पावसाचा खेळ होणार आहे. Accuweather.com नुसार, येथे 80% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 3 ते 4 तास हलका किंवा जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामना उशिराने सुरु होण्याची शक्यता आहे.  


या सामन्याच्या पहिल्या दिवशीही पावसामुळे सुमारे तासभर खेळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात 17 षटके कमी टाकण्यात आली. आता दुसऱ्या सामन्यात नेमकं होत काय हे थोड्याच वेळात कळणार आहे.  


एजबॅस्टन कसोटीची पहिली दोन सत्रे इंग्लंडच्या नावावर होती. मात्र तिसरे सत्र भारताने नावावर केले. भारताने केवळ 98 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पंतने सर्वाधिक 146 धावा केल्या. पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा नाबाद ८३ आणि मोहम्मद शमी नाबाद परतले आहेत.