मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने पार पडले. त्यामध्ये भारताने 2-1ने आघाडी घेतली. चौथ्या कसोटी सामन्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा सामना 4 मार्चपासून खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चौथ्या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघातून बाहेर जाण्याची विनंती BCCI ला केली. वैयक्तीक कारणामुळे ही विनंती करण्यात आली होती. बुमराहची अडचण लक्षात घेऊन त्याला संघातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. उत्तम वेगवान गोलंदाज ऐन चौथ्या कसोटी सामन्याआधी संघाबाहेर पडल्यानं हा धक्का मानला जात आहे. 
 
चौथ्या कसोटी सामन्यात कोणाला संधी?


चौथ्या कसोटी सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ जिंकला तर पोहोचू शकेल. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर तंबूत पाठवण्यात यश मिळेल का हे पाहावं लागले.


4 मार्च रोजी होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागेवर भारतीय संघातील मोहम्मद सिराजला संधी भेटू शकते. गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक करणामुळे उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी प्लेइंग इलेवनमध्ये गोलंदाज सिराजला भारतीय संघात संधी मिळू शकते. 


मोहम्मद सिराजनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिराजचा विचार चौथ्या कसोटीमध्ये प्लेइंग इलेवनसाठी केला जाऊ शकतो. 


उमेश यादवलाही मिळू शकते ही संधी
चौथ्या मालिकेत भारतीय संघातील एक जेष्ठ वेगवान गोलंदाज उमेश यादवला ही मिळेल अशी दुसरी शक्यता आहे. ज्यामध्ये मागील तीन वर्षाच्या कालावधीतील भारतीय पिचवर उमेश यादवचा स्ट्राइक रेट, गोलंदाज आर.अश्विन पेक्षा उत्कृष्ट आणि श्रेष्ठ ठरला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेऴत आसताना टेस्ट मध्ये दुसऱ्या डावात जखमी होऊन संघाबाहेर गेले. सध्या उमेश यादव पूर्णपणे फिट आहे. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. 


2 दिवसांत संपला तिसरा कसोटी सामना
भारत विरुध्द इंग्लंड होणाऱ्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा जगातील सर्वात मोठा नरेंद्र मोदी स्टेडियम इथे खेऴवण्यात आला. भारताने 10 गडी राखून इंग्लडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. इंग्लंडने ट्रॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंड संघ पहिल्या डावात 122 धावा करत तंबूत परतला. भारताने पहिल्या डावामध्ये 145 धावा केल्या. 


दुसऱ्या डावांमध्ये इंग्लंड संघाचा धुव्वा उडवला. भारतीय फिरकी गोलंदाजाने संपूर्ण संघातील इंग्लंडवर 81 धावांवर ऑलआउट केले. विशेष म्हणजे भारताला विजय मिळवण्यासाठी 49 लक्ष उभे राहीले आहे. तर चार सामन्याच्या मालिकेतील भारतीय संघाने 2-1 अशी अघाडी घेतली आहे.