Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध भेदक बॉलिंग करुन खळबळ उडवून दिली. बॉल कुठून येऊन विकेट हिट करतोय हे इंग्लंडच्या दिग्गज बॅटर्सना कळत नव्हतं. लाखो भारतीय बुमराहच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले होते. बुमराहला आपल्या सर्वक्षेष्ठ खेळाचे प्रदर्शन पाहताना भारतीयांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. या गोलंदाजी आणि खेळाबद्दल बुमराहला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याची त्याने दिलखुलास अशी उत्तरे दिली. काय म्हणाला बुमराह? याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉस रिव्हर्स होतोय तर यामध्ये मॅजिक शोधण्याची गरज नाही, असे आपल्या बॉलिंगबद्दल बुमराहला वाटते. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बुमराहने बॉल रिव्हर्स करुन शेवटच्या 2 सत्रात खरतनाक स्पेल टाकला. यामुळे 15.5 ओव्हरमध्ये त्याने अवघ्या 45 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या. बुमराहच्या बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडची टीम 253 रन्सवर तंबूत परतली आणि त्यांनी 143 चा लीड घेतला. 


सिरीजच्या सुरुवातीच्या मॅचमध्ये बुमराहला रिव्हर्स स्विंगचा फायदा मिळाला होता. पण शनिवारी त्याची खेळी तोंडात बोटे टाकणारी होती. त्याने बॉल दोन्ही बाजुने मूव्ह करुन जो रुट, जॉनी बेयरस्टो आणि ओली पोप यांना धक्के दिले. क्षणभर ते यातून सावरु शकले नाहीत. हा ऐतिहासिक क्षण वाटत होता. सोशल मीडियामध्ये पोपसा इनस्विंगर यॉर्कर टाकून बोल्ड केल्यचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 


फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तुम्ही विकेट घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला रिव्हर्स स्विंग बॉलिंग शिकावी लागेल. मी पारंपारिक स्विंगआधी रिव्हर्स स्विंग करायला शिकलो. कारण आपण स्लो विकेटवर जास्त क्रिकेट खेळतो. त्यामुळे येथे कशी बॉलिंग करायची हे आपल्याला समजते. तुम्हाला स्ट्रॅटर्जी ठरवावी लागेल. कुठे तुम्ही हिट करु शकता, हे पाहावं लागेल. त्यामुळे नेटमध्ये याची जास्त प्रॅक्टीस केली आणि विकेट घेण्याचा प्रयत्न केल्याचे बुमराहने सांगितले. 


पोपला आऊट करण्याधी काय विचार केला होता? असा प्रश्न बुमराहला विचारण्यात आला. त्यामुळे बॉल कडक होता. हो. त्यावेळी रिव्हर्स स्विंग होत होता. रिव्हर्स स्विंग होत असताना तुम्हाला प्रत्येक बॉल जादुई पद्धतीने फेकण्याची गरज नसते, असे बुमराह म्हणाला. मी काही बाहेरचे बॉल टाकले होते तेव्हा मला कोणता बॉल टाकायला हवा? हे माझ्या डोक्यात सतत सुरु होते. पण मी तेव्हा यॉर्कर टाकला नव्हता. तेव्हा मी विचार केला, चला रिस्क घेऊया आणि तो चांगला स्विंग झाला. मी खूप चांगल्या पद्धतीने बॉल टाकला, याबद्दल खूप आनंदी असल्याचे तो सांगतो. 


150 विकेट झाल्याबद्दल बुमराहला विचारण्यात आले. यावर आपण आनंदी असल्याचे त्याने सांगितले. नंबर्स न पाहण्याचे मी ठरवतो. असे केल्यास तुम्ही तसे न केल्यास स्वत:वर दबाव बनतो आणि खेळ एन्जॉय करता येत नाही. मला त्यावेळी केवळ टेस्ट क्रिकेट खेळायचे होते, असे तो सांगतो.