मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 3 सामन्यांची वन डे सीरिज सुरू आहे. पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडला 66 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर दुसरा वन डे सामना 26 मार्च रोजी होणार आहे. हा सामना जिंकणं इंग्लंडसमोर आव्हान असणार आहे. या सामन्याआधीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वन डे सामन्यात इयोन मॉर्गन खेळेल याची शक्यता धूसर असल्याचं सांगितलं जात आहे. मॉर्गन व्यतिरिक्त सॅम बिलिन्ग्सच्या खेळाण्याबाबतही मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू इंग्लंड संघाकडून दुसऱ्या वन डेमध्ये खेळणार नसतील तर भारतासाठी दिलासा देणारी गोष्ट तर इंग्लंडला मोठा धक्का बसणार आहे. 


पहिला वन डे सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघालाही मोठा धक्का बसला आहे. इयोन मॉर्नला दुखापत झाल्यामुळे पुढचा वन डे सामना खेळणार की नाही याबाबत अद्यापही शंका आहे. पहिल्या वन डे सामन्यादरम्यान फिल्डिंग करत असताना मॉर्गनला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. 


Ind vs Eng: टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मोठे खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता


 


इयोनने 22 धावा केल्या तर सॅमनं 18 धावांचं पहिल्या वन डे सामन्यात योगदान दिलं आहे. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार सॅमच्या जॉइन्टमध्ये दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. 


33 व्या ओव्हरदरम्यान बाउड्रीवर चौकार जात असलेला बॉल अडवताना सॅमला दुखापत झाली आहे. सध्या दोघांवरही उपचार करण्यात आले आहेत मात्र दुसऱ्या वन डे सामन्यात खेळणार की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे.