IND vs ENG Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील (India vs England) पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता रोहितसेना इंग्लंडचा खेळ खल्लास करण्यासाठी मैदानात उतरेल. अशातच आता मालिका सुरू होण्याआधी इंग्लंडकडून रडीचा डाव खेळला जातोय. मालिका सुरू होण्याआधीच  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (ollie robinson) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबाबत (virat kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. रॉबिन्सन कोहलीला जे काही बोलला ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला ollie robinson ?


विराट कोहलीला खूप अहंकार आहे. या स्टार खेळाडूला नेहमी कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवण्याची संधी मिळते. तुम्हाला नेहमी सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायचं असतं ना? मग तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला नेहमी उत्तम फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळत नाही. तुम्हाला कोहलीला बाद करण्याची संधी आहे. कोहलीला मोठा अहंकार आहे. कसोटी सामने भारतात होणार आहेत आणि कोहली नेहमी वरचढ ठरण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सामने रोमांचक होणार आहेत, असं ओली रॉबिन्सनने म्हटलं आहे. जर मी चांगली कामगिरी केली तर मी संघात माझं स्थान निश्चित करू शकतो, असंही ओली रॉबिन्सनने म्हटलं आहे.


पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया -


रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.


भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ – 


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.


भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…


पहिली कसोटी :  25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी :  2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी :  15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी :  7-11 मार्च, धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)