मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिजच्या तिसऱ्या सामन्यात 7 धावांनी टीम इंडियाला विजय मिळाला. इंग्लंड संघातील सॅम करन याने शेवटपर्यंत इंग्लंडच्या संघाला जिंकवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले मात्र ते अपयशी ठरले. सॅमने 95 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंड संघातील इतर फलंदाजांच्या तुलनेत त्याची कामगिरी जास्ती सरस ठरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेच्या शेवटच्या वन डे सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळविला असला तरी तो इतक्या सहजासहजी विजय मिळाला नाही. ह्या रोमांचक सामन्यात इंग्लिश अष्टपैलू सॅम करनने क्रिझवर मैदान दणाणून सोडल्याचं पाहायला मिळालं. करननं शेवटपर्यंत आपल्या फलंदाजीचा थरार शेवटपर्यंत ठेवला होता. 


सॅम करन इंग्लंड संघाला सामना जिंकवून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष असतानाच हार्दिक पांड्या आणि भुवीने मात्र त्याच्या फलंदाजीचा वेग थोपवून धरलं आणि 7 धावांनी टीम इंडियाला विजय मिळाला. करनया या तुफान फलंदाजीमागे महेंद्र सिंह धोनीचा हात असल्याचा दावा इंग्लंड संघातील खेळाडूनं केला आहे. 


करनमध्ये धोनीची झलक
इंग्लंडचे कार्यवाहक कर्णधार जोस बटलरला तिसर्‍या आणि शेवटच्या वन डे सामन्यात अष्टपैलू सॅम करनमध्ये एम एस धोनीची झलक दिसून आली. सामन्यानंतर बटलर म्हणाला की, सॅमने नाबाद डाव खेळला आणि सामना गमावल्यामुळे निराशा झाली तरीही यामुळे त्याला आणखी प्रगती करण्यास मदत होईल.


सॅमच्या यशामागे धोनीचा हात? 
सॅमने ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत सामना खेळला ते पाहता त्याच्यात धोनीची झलक असल्याचं बटलरने म्हटलं आहे. धोनी एक दिग्गज खेळाडू आहे. IPLमध्ये त्याच्याकडून सॅमला खूप शिकायला मिळालं आहे. सॅमकडून आम्ही देखील सर्वांनी हीच गोष्ट शिकायला हवी. शेवटपर्यंत एकट्यानं खिंड लढवण्याची ही ताकद त्याच्याकडून नक्कीच शिकण्यासारखी आहे असंही बटलरने म्हटलं आहे.