T20 World Cup: यंदाचा वर्ल्डकप भारताच्याच पारड्यात; `हा` योग जुळून आलाय
टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Ind Vs Eng Semi Final) धडक मारली असून 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत सामना रंगणार आहे.
T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) आता अंतिम टप्पात येऊन पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये (Ind Vs Eng Semi Final) धडक मारली असून 10 नोव्हेंबर रोजी इंग्लंडसोबत सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यांमध्ये अंपायर कोण असतील याची आयसीसीने घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे अंपायरची (umpire name) नावं जाहीर केल्यानंतर भारतीय चाहत्यांना हायस वाटलं आहे. याचं कारण म्हणजे रिचर्ड केटलब्रॉ (Richard Kettleborough) यांचा यामध्ये समावेश नाहीये.
आयसीसीने सोमवारी सेमीफायनलच्या सामन्यांसाठी असलेल्या अंपायरची नाव घोषित केली. 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडमध्ये होणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंड यामध्ये आयसीसीकडून 2 फील्ड अंपायर, थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी यांचा समावेश असणार आहे.
फील्ड अंपायर: कुमार धर्मसेना आणि पॉल रिफेल
थर्ड अंपायर: क्रिस गफ्फनी
फोर्थ अंपायर: रोड टकर
मॅच रेफरी: डेविड बून
रिचर्ड केटलब्रॉ यांच्याशी काय आहे कनेक्शन?
रिचर्ड केटलब्रो 2014 पासून जवळपास सर्व ICC स्पर्धांमध्ये नॉकआउट फेरीत टीम इंडियासाठी 'पनौती' ठरलेत. रिचर्ड केटलब्रॉ यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भारताने खेळलेल्या जवळपास सर्वच ICC नॉकआउट मॅचेसमध्ये अंपायरिंग केलंय. इतकंच नाही तर या सामन्यांमध्ये भारताचा पराभवही झालाय.
अंपायर रिचर्ड केटलब्रॉ हे नेहमीच टीम इंडियासाठी अनलकी ठरलेत. खासकरून आयसीसी स्पर्धांच्या नॉकआऊट सामन्यांत हे जास्त घडताना दिसलंय. रिचर्ड केटलब्रो यांनी गेल्या काही वर्षांमध्ये भारताने खेळलेल्या जवळपास सर्व ICC नॉकआऊट सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम केलंय. भारताने ते सर्व सामने गमावलेत. भारताने सर्व ICC स्पर्धा गमावल्या आहेत ज्यात रिचर्ड केटलब्रो हे 2014 पासून भारताच्या मॅचेससाठी अंपायर म्हणून कार्यरत होते.
2014 च्या T20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत विरूद्ध श्रीलंका, 2015 च्या आयसीसी वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, 2016 च्या T20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध, 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2021 च्या ग्रुपस्टेजमध्ये न्यूझीलंडविरूद्ध या सर्वा सामन्यांमध्ये केटलब्रॉ असताना टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
सेमीफायनलच्या सामन्यासाठी रिचर्ड हे अंपायर नसल्याने भारतीय चाहत्यांना आनंद झालाय. यावर अनेकांनी आता वर्ल्डकप भारतच जिंकणार असंही म्हटलंय.