IND vs ENG T20 World Cup 2nd Semifinal Latest Updates:  T20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यात पुन्हा फायनल (final) होण्याची चिन्ह दिसतायत. दरम्यान यासाठी टीम इंडियाला सर्वात मोठा सामना गाठणं आवश्यक आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला (pakistan) नमवून फायनलचा मार्ग गाठला आहे. तर टीम इंडिया आता फायनलचं तिकीट मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी टीम इंडियाला प्रथम इंग्लंडला मात देणं गरजेचं आहे. अॅडलेडमध्ये उद्या भारत विरूद्ध इंग्लंड (IND vs ENG) सेमीफायनल होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे यावर एक नजर टाकूया.


पंतला सेमीफायनलमध्ये संधी प्रवेश?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केलीये. सुपर-12 फेरीत 5 पैकी 4 सामने जिंकलेत. यामध्ये 3 सामन्यांत टीम इंडियाची एकच प्लेइंग इलेव्हन होती. फक्त दोन सामन्यांमध्ये त्यात बदल झाला. या 2 सामन्यामध्ये 2 जागा बदलण्यात आल्या. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल फेरीत पुन्हा एकदा या बदलांकडे लक्ष द्यावं लागणार आहे. हे बदल म्हणजे दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? आणि अक्षर पटेल की दीपक हुड्डा/युझवेंद्र चहल?


भारताने आतापर्यंत दिनेश कार्तिकला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. याठिकाणी ऋषभ पंतला संधी दिली गेली. मात्र झिम्बाब्वेविरुद्धची ही संधी फारशी योग्य ठरली नाही.


फलंदाजीचा क्रम


टीम इंडियासाठी केएल राहुलने बांगलादेशविरुद्ध चांगला खेळ केला होता. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासोबत तो ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. ज्यावेळी हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असतात तेव्हा टीम इंडियाची सुरुवात चांगली होते. विराट कोहली टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसतो. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर अनेक जिंकलेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणं ठरलंय.


कशी असेल मिडल ऑर्डर


चौथ्या क्रमांकावर स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादवला संधी मिळणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याला पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे.


रोहित या गोलंदाजावर ठेवणार विश्वास


जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) वेगवान गोलंदाज म्हणून टीममध्ये स्थान देण्यात येईल. तर मोहम्मद शमी आणि र्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांनाही टीममध्ये संधी देण्यात येईल. 


IND vs ENG: संभाव्य प्लेईंग इलेवन


भारतः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.