T20 World Cup 2024 IND vs ENG: टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली असून आज गयानाच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये हा सामना होणार असून जिंकणारी टीम फायनलमध्ये धडक मारणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम जिंकण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार आहे, हे जाणून घेऊ.ा, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने या टी-20 वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. आज सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारताला इंग्लंडचा सामना करायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. 2022 च्या सेमीफायनलच्या फेरीत इंग्लंडने त्यांचा पराभव केला. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल करणार नाही. 


भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयानामध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया कदाचित प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. यामध्ये टीममध्ये जरी बदल करायचा झाला तरी युझवेंद्र चहलची एंट्री टीममध्ये होण्याची शक्यता आहे. चहल हा अनुभवी स्पिनर गोलंदाज आहे. तो अनेक प्रसंगी टीमसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कुलदीप यादवही टीमसाठी एक्स फॅक्टर ठरू शकणार आहे. कुलदीप इंग्लंडच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी केली. या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या T20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली काही खास करू शकला नाही. तो आतापर्यंत ओपनर म्हणून अपयशी ठरला आहे. मात्र रेकॉर्ड पाहिले तर कोहलीचा इंग्लंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्याची बॅट जर या सामन्यात चालली तर इंग्लंडच्या गोलंदाजांची अवस्था वाईट होण्याची शक्यता आहे. कोहलीने मोठ्या सामन्यांमध्ये अनेकदा आपली ताकद दाखवली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांची कामगिरीही महत्त्वाची ठरू शकते.


कशी असून शकते इंग्लंडविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव / युझवेंद्र चहल


इंग्लंडची संभाव्य प्लेईंग 11


फिल सॉल्ट, जॉस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, मोइन अली, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, रीस टॉप्ली, आदील राशिद