मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील रोहितची कामगिरी दमदार राहिली. त्यानंतर टी 20मध्ये देखील तो अत्यंत महत्त्वाची  भूमिका निभावत आहे. याच जोरावर त्याला वन डे सीरिजमध्ये उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मानं टी 20 सामन्यांमधील एक अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय खेळाडू ठरल्यानं त्याचं कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20मध्ये हिटमॅन रोहित शर्मा आपला 342वा सामना खेळत होते. हा विक्रम करण्यासाठी केवळ 11 धावा आवश्यक होत्या. आदिल राशीदच्या बॉलवर रोहितनं पहिला षटकार आणि नंतर चौकार मारून हा विक्रम चौथ्या टी 20 सामन्यात केला आहे. 


भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 12 धावा करू शकला, परंतु यादरम्यान त्याने टी -20 क्रिकेटमध्ये त्याने 9000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज आणि जगातील नववा फलंदाज ठरला आहे.


टी -20 मध्ये 342 वा सामना खेळणार्‍या रोहित शर्माला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी केवळ 11 धावांची आवश्यकता होती. आदिल रशीदच्या बॉलवर त्यानं एक चौकार आणि षटकार ओढून हा विक्रम पूर्ण केला. त्यानंतर एक धावा काढून तंबूत परतला.


टी 20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱा क्रिस गेल 13720 पहिला फलंदाज आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा कीरोन पोलार्ड 10629, पाकिस्तानच्या शोएब मलिकने 10488 धावांचा विक्रम केला आहे. न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकुलम 9922, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं 9824, ऐरॉन फिंच 9718 त्यानंतर कोहली आणि एबी डिविलियर्स 9111 आणि आता या यादीमध्ये नवव्या स्थानावर रोहित शर्माच्या नावाचा समावेश झाला आहे. 


चौथ्या टी 20 सामन्यामध्ये रोहित शर्मा 12 धावांवर आऊट झाला. त्यानंतर जेव्हा विराट कोहलीला फील्डिंगदरम्यान दुखापत झाली तेव्हा टीमची सूत्र सांभाळण्याची जबाबदारी रोहित शर्मावर आली. रोहितने नियोजन करत टीमला सांभाळून घेत निसटता विजयही खेचून आणला आहे. इतकंच नाही तर त्याचा हा विक्रम पूर्ण झाल्यामुळे सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुक होत आहे.