अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 5 सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना होत आहे. संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद इथे हा सामना खेळवला जाणार आहे. कसोटी सामन्या सारखंच या सामन्यातील भारतीय संघात तीन स्पिनर गोलंदाज असणार आहेत. अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार संघातून खेळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेइंग इलेवनमध्ये स्पिन स्पेशलिस्ट यजुवेंद्र चहल, ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरला संघातून खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


भुवनेश्वर कुमार, शार्दूल आणि हार्दीक पांड्या तीन वेगवान गोलंदाज संघात असणार आहेत. ओपनिंगसाठी के एल राहुल आणि रोहित शर्मा उतरणार असल्याचं निश्चित आहे. विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, मला तो संघात आल्याचा आनंद आहे आणि तो देखील चांगली कामगिरी करेल. 


IPLचे दिमाखदार सोहळे करूनही 7 वर्षांत 26300 कोटींचा फायदा


या टी -20 मालिकेसाठी भुवी संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज असेल आणि त्याच्यासोबत दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन असतील असंही विराटनं माहिती दिली. मात्र टी नटराजनला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला का आणि त्यानंतर लगेच खेळणार का हे आज प्रत्यक्षात सामन्यावेळी स्पष्ट होणार आहे.