अहमदाबाद : टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी -२० मध्ये जोफ्रा आर्चरला रिव्हर्स स्वीप देऊन सिक्स मारला. हा शॉट पाहिल्यानंतर आर्चरसह संपूर्ण इंग्लंड संघ आश्चर्यचकित झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर पंतने हा शॉट खेळला. या शॉटच्या आधी आर्चर चांगली गोलंदाजी करत होता. पंतने पुढच्या चेंडूवर आणखी एक चौकार ठोकला. पंत यांची रिव्हर्स स्वीप सोशल मीडियावर चर्चेत आहे.



माजी अष्टपैलू युवराज सिंगने ट्विटरवर लिहिले की, 'ही नवी पिढी आहे !! अगदी निर्भय! याला रिव्हर्स स्वीप किंवा काही अजून म्हणा, मला माहित नाही. पण वेगवान गोलंदाजावर असा शॉट खेळणं, ऋषभ पंत तुला हॅट्स ऑफ. पंतच्या या शॉटमुळे माजी सलामीवीर गौतम गंभीरही आश्चर्यचकित झाला. गंभीर म्हणाला की, मी असे शॉट्स खेळण्याची हिम्मत कधी केली नाही.'


यापूर्वी पंतने कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनविरूद्धही असाच शॉट मारला होता. त्यावेळी पंतच्या या शॉटचे कौतुक झाले होते.



पंत टी-20 संघात परतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याने नुकतीच एक शानदार कसोटी मालिका खेळली. या कामगिरीचे प्रतिफळ त्याला मिळाले आहे. ऋषभ पंतने मागील वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध अखेरचा टी -20 सामना खेळला होता. या सामन्यानंतर भारताने सन 2020 मध्ये आणखी 9 टी -20 सामने खेळले. पण पंतला या सामन्यांमध्ये जागा मिळाली नव्हती.