मुंबई : इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या टी20 सामना टीम इंडियाने 49 धावांनी जिंकला. या सामन्यात इंग्लंड संघात डेब्यू करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन या बॉलरने टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचे विकेट काढत मोठा धक्का दिला होता. मात्र इतर खेळाडूंनी चांगली बॅटींग करत सामना सावरला आणि जिंकला देखील. मात्र पहिल्याच सामन्यात स्टार खेळाडूंचे विकेट घेणाऱ्या या खेळाडूने वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठ चॅलेंज दिले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने शानदार पदार्पण केले होते. रिचर्ड ग्लीसन पहिल्याच सामन्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचे विकेटस घेतले होते. ग्लेसनने भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा (31), ऋषभ पंत (26) आणि विराट कोहली (1) यांना बाद करत स्वप्नवत पदार्पण केले होते. मात्र इतकी शानदार गोलंदाजी करून सुद्दा इंग्लंड सामना जिंकू शकला नाही. इंग्लंडने हा सामना 49 धावांनी गमावला आणि तीन सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली.  


डेली मेलशी बोलताना ग्लेसन म्हणाला की, "इंग्लंडसाठी खेळण्याचा कधीही विचार केला नाही, मी फक्त सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो आणि मी इथपर्यंत पोहोचलो आहे, असे तो म्हणालाय. 


ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळणे हे त्याचे स्वप्न आहे का, असे विचारले असता गोलंदाज म्हणाला, हो, मला मला मोठया सामन्यात खेळायचे आहे. म्हणजेच वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवण्याचे त्याचे ध्येय आहे. मी फक्त पुढच्या सामन्याचा विचार करत आहे आणि तेच झाले. मी पुढे जाईन, असे तो म्हणालाय.  


दरम्यान टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या भूमीवर टी-20 मालिका क्लीन स्वीप करण्याची भारताला चांगली संधी आहे.