IND vs ENG T20 : रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? विराटने केलं स्पष्ट
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
मुंबई : इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे, ज्याचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 12 मार्चपासून म्हणजेच शुक्रवारपासून खेळला जाईल. या मालिकेविषयी अशी चर्चा होती की रोहित शर्माबरोबर कोणता फलंदाज ओपनिंग करेल. केएल राहुल की शिखर धवन. आता याबाबत कर्णधार विराट कोहलीनेच स्पष्ट केलं आहे की, रोहित सोबत सलामीवीर म्हणून टी-20 मालिकेसाठी केएल राहुल हा टीम इंडियाची पहिली निवड असेल, म्हणजेच शिखर धवनला आता थांबावं लागणार आहे.
रोहित शर्मासह इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीवीर म्हणून केएल राहुल ही पहिली पसंती असल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. केएल राहुल चांगल्या फॉर्मात आहे आणि त्याने या क्रमांकावर खेळतांना संघासाठी बरीच चांगली कामगिरी केली आहे. धवनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकही झळकावले आणि त्याचा फॉर्मही चांगला आहे, टी -२० विश्वचषक पाहता टीम मॅनेजमेंट, धवन ऐवजी केएल राहुलला संधी देण्याचा विचार करत आहे. तर धवनला आता बॅकअप सलामीवीर म्हणून ठेवले जाऊ शकते.
विराट कोहलीने हे स्पष्ट केले आहे की, धवन हा संघाचा बॅकअप सलामीवीर असेल, यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, रोहित किंवा राहुल यांच्यापैकी कुणालाही दुखापत झाली तर धवनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. कोहली म्हणाला की, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आमच्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि या मालिकेसाठी आमची पहिली पसंत रोहित आणि राहुल असेल. याक्षणी हे तीनही सलामीवीर फलंदाज टीम इंडियासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असून निवडीसाठी उपलब्ध आहेत. रोहित शर्मा पहिला सलामीवीर आहे, परंतु राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत 224 धावा केल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तीन टी -20 सामन्यांत 81 धावा केल्या.
टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीविषयी माहिती दिल्यानंतर, विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाला, मला तो संघात आल्याचा आनंद आहे आणि तो देखील चांगली कामगिरी करेल. या टी -20 मालिकेसाठी भुवी संघाचा आघाडीचा वेगवान आक्रमण करणारा गोलंदाज असेल आणि त्याच्यासोबत दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन असतील.