Ind vs Eng: तिसऱ्या वन डे सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल
भारत विरुद्ध इंग्लंड आज पुण्यात तिसरा वन डे सामना सुरू आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड आज पुण्यात तिसरा वन डे सामना सुरू आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा तिसरा वनडे सामना पुण्याच्या एमसी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत.
टीम इंडियात तिसऱ्या वन डे साठी एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादवच्या जागी टी नटराजनला संधी देण्यात आली आहे. तर पहिल्या वन डे सामन्यामध्ये श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे उर्वरित दोन समान्यांसाठी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियामध्ये प्लेइंग इलेवनमध्ये कोणकोण
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, टी नटराजन आणि प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंड टीम प्लेइंग इलेवनमध्ये कोणकोण
जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरेन, आदिल राशिद, रीस टॉपले आणि मार्क वुड