Ind vs ENG : धर्मशाळेत इतिहास घडवणार टीम इंडिया! होणार का 112 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी?
IND vs ENG : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका 3-1 जिंकून आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. पण, यानंतर भारताने सलग तीन सामने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. आता पाचवा सामना औपचारिक असला तरीही टीम इंडियाकडे इतिहास घडवण्याची संधी आहे.
Dharamshala test : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरीजमध्ये टीम इंडिया फॉर्मात आहे. पाच सामन्यांची ही सिरीज आपल्या खिशात असली तरीही रोहितसेनेची नजर धर्मशाळा येथे होणाऱ्या टेस्ट मॅचवर असेल. तब्बल सात वर्षानंतर टीम इंडियाचा टेस्ट सामना धर्मशाळेत खेळला जातोय.
भारतीय संघाने 2017 मध्ये ऑस्ट्रलिया विरोधात धर्मशाळा येथे टेस्ट सामना खेळला होता. त्यामध्ये कांगारूंना 8 गडी राखून बाद करण्यात आले होते. त्यातही महत्वाचे म्हणजे, इंग्लंडविरुद्ध 7 मार्च रोजी खेळला जाणारा सामना जिंकल्यास भारताकडे 112 वर्षांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असेल.
रोहितच्या युवा टीमने केले बॅझबॉलला चूप
इंडियाविरूद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला हार पत्करावी लागली होती, यानंतर टीम इंडियाच्या प्रदर्शनावर खूप टीका झाली होती. त्यावेळी बऱ्याच क्रिकेटतज्ञांचे मानने होते की विराट कोहली आणि मोहम्मद शामी विना इंडियन टीमला ही कसोटी मालिका जिंकणं कठीण होईल, पण रोहित अॅण्ड कंपनीने हार न मानता जिद्द आणि मेहनतीच्या बळावर इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पूढील तीन सामने जिंकत बॅझबॉलसमोर आपली ताकद दाखवली होती.
टीम इंडिया धर्मशाळेत इतिहास रचणार?
भारतीय टीमने जर धर्मशाळेतील शेवटची टेस्ट मॅच जिंकली तर ते एका 112 वर्ष जून्या रेकॉर्डची बरोबरी करणार आहेत. टेस्टच्या इतिहासात फक्त ३ वेळेस असे झाले आहे की, एका टिमने 5 मॅचच्या सिरीजमध्ये पहिला सामन्यात हार पत्करून राहिलेले 4 सामने जिंकलेले आहेत. 112 वर्ष पहिले इंग्लंडच्या टीमने हा कारनामा केला होता म्हणजेच 1912 मध्ये इंग्लंडने हा रेकॉर्ड बनवला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीम इंडिया इंग्लंडविरूद्धच हा रेकॉर्ड परत बनवण्यासाठी सज्ज आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने हा ऐतिहासिक रेकॉर्ड 1897/98 आणि 1901/02 साली बनवला होता.
5 व्या टेस्ट साठी टीम इंडियाचा स्क्वॉड :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
5 व्या टेस्ट साठी टीम इंग्लंडचा स्क्वॉड :
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स एंडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हैरी ब्रूक, जैक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, ओली पॉप, ओली रॉबिन्सन, जो रूट , मार्क वुड, डेनिएल लॉरेंस